पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 3) रात्री 80 वर्षीय ज्येष्ठाचा करोनाने मृत्यू झाला. तर, गुरुवारी बोपाडी आणि दापोडी येथील प्रत्येकी एकाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मृत्यू झालेल्या वृद्धाला 25 मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पहिल्या दिवसापासून ते व्हेंटीलेटरवर होते. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 12 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
रुग्णालयात आत्तापर्यंत दाखल एकूण 140 रुग्णांना करोनाची लागण झाली.
त्यातील 34 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, 23 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 71 जणांना अन्य रुग्णालयात हलविले आहे. 4 जणांचा करोना चाचणीचा अहवाल प्रलंबित आहे. 12 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.