नवी दिली : गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला भारतीय जनतेने भरभरून प्रेम दिल्यानं ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकाने आज आपल्या दुसऱ्या टर्ममधील प्रथम वर्ष पूर्ण केलं आहे.
मोदी सरकार २.० च्या वर्षपूर्तीनिमित्ताने देशातील भाजप नेते सरकारचे अभिनंदन करताना दिसत आहेत. अशातच भाजप खासदार व अभिनेते रवी किशन यांनी देखील मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळली असून पंतप्रद्द्धां मोदींचेही तोंडभरून कौतुक केले आहे.
याबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रवी किशन यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक देशभक्त पंतप्रधान मिळाले आहेत. पंतप्रधान मोदी हे वैयक्तिक स्वार्थाला बाजूला सारून भारत मातेची व तिरंग्याची सेवा कारण्यामध्येच धन्यता मानतात.” असं मत व्यक्त केलं आहे.
एक ऐसे प्रधानमंत्री के बारे में हम लोग सुनते थे जो मां भारती से प्यार करता हो, ऐसा त्यागी हो जिसे स्वयं कुछ नहीं चाहिए वो इस धरती की और तिरंगे की सेवा करे। वो प्रधानमंत्री हमें नरेंद्र मोदी जी मिले: मोदी सरकार के दूसरे कार्यकाल का पहला वर्ष पूरा होने पर बीजेपी सांसद रवि किशन pic.twitter.com/ud7FudupgW
— ANI_HindiNews (@AHindinews) May 30, 2020