नाशिक – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रकार वाढले आहे. नाशिकमध्ये आज पहाटे बिबट्याने भरवस्तीत एका व्यक्तीवर हल्ला केला. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगरमध्ये पहाटे साडेपाच वाजता सुपडू लक्ष्मण आहेर आणि राजेंद्र जाधव हे सोसायटीच्या आवारात फिरत होते. यावेळी बिबट्याने त्यांना पाहिल्यानंतर तो वेगाने त्यांच्या दिशेने धावत आला आणि या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर बिबट्याने सोसायटीच्या मागील बाजूस धूम ठोकली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
#WATCH Maharashtra: A leopard was seen attacking a man in Indira Nagar area of Nashik y’day. The leopard has attacked two people here, giving them serious injuries. Forest Officials say, “Its footprints can be traced to forests. Our team is at the spot.” (Source: CCTV footage) pic.twitter.com/9MTCCHW73N
— ANI (@ANI) May 30, 2020
दरम्यान, सध्या वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बिबट्याचा पावलांचा माग काढला जात आहे.