पिंपरी – गेल्या दोन दिवसांपासून शहरात उकाडा असह्य होत आहे. बुधवारी देखील पुन्हा एकदा पाऱ्याने 40 अंश सेल्सियसपर्यंत उसळी घेतल्याने नागरिकांचे उकाड्याने हाल झाले.
कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले असतानाच दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा आणखीनच वाढला होता. तर किमान तापमान 23. 6 अंश इतके नोंदविण्यात आले.