वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ वर गेल्याने प्रशासनाच्यावतीने वाघोली गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. मेडिकल व दूध याच्या व्यतिरिक्त इतर साहित्याची उपलब्धता यांचेवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
किराणा व भाजीपाल्याची अत्यंत गरज असल्याची माहिती नागरिकांनी चिराग सातव यांना दिल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वपरवानगीने सोशल डिस्टन्स ठेऊन चिराग सातव पाटील मित्रपरिवाराने किराणा व भाजीपाल्याची नागरिकांना उपलब्ध करून दिले व सुरक्षित आरोग्यदायक सवयी लावण्याबाबत आवाहनही केले.
नागरिकांना किराणा व भाजीपाल्याची उपलब्धता करून दिल्याबद्दल नागरिकांनी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व चिराग राजेंद्र सातव पाटील यांचे आभार मानले.
वाघोली मध्ये सुरक्षित अंतरावर उभे राहून व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची सवय नागरिकांमध्ये लागली असल्याबद्दल चिराग सातव, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.