वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकन आणि भारतीय नागरीक मिळून 40 जण करोनाच्या बाधेमुळे मरण पावले. तर सुमारे 1500 जण बाधित झाले आहेत. अमेरिकेत गेल्या 24 तासांत दोन हजार 108 जणांचा मृत्यू करोनामुळे झाला. एका दिवसांत दोन हजारपेक्षा अधिक मृत्यू घडलेला अमेरिका हा पहिला देश ठरला आहे.
मरण पावलेल्यामंध्ये 17 जण केरळचे तर 10 जण गुजरातचे रहिवासी आहेत. पंजाबच्या चार, आंध्रच्या दोन जणांनी तर ओडिशाच्या एका नागरिकाने आपले प्राण गमावले. यातील बहुसंख्य 50 वर्षाच्या पुढील आहेत. तर एक 21 वर्षांचा आहे. पेनीसिल्व्हानिया अणि फ्लोरीडा प्रांतात चार तर टेक्सास आणि कॅलिफोर्निया येथे प्रत्येकी एका भारतीय वंशीयांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क मध्ये 15 भारतीय वंशीयांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.