करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनामुळे 40 जणांचा बळी गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर यात आहे. तर तब्बल 1 हजार 035 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा 7 हजार 447 वर पोहचला आहे.
यातच भारतात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून सगळ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद व्हायच्या काही दिवसच आधी कृति खरबंदा परदेशातून भारतात परत आली असून ती गेल्या काही दिवसांपासून क्वॉरंटाईनमध्येच राहात आहे. कृतिला परदेशातून आल्यानंतर सर्दी, खोकला झाला होता. त्यामुळे तिला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची भीती तिला वाटायला लागली होती.
कृतिने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. कृतिने म्हटले आहे की, परदेशातून मी घरी परतले असता मला प्रचंड सर्दी, खोकला झाला होता. त्यावेळी तर भारतात कोरोनाची टेस्ट करण्याची किट देखील उपलब्ध देखील झालेली नव्हती. त्यामुळे माझ्या डॉक्टरांनी मला लक्षणं वाढतात आहेत का याकडे बारकाईने लक्ष द्यायला सांगितले आणि मला सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहाण्याबाबत सल्ला दिला.
दरम्यान, तीन दिवस माझी तब्येत खूपच खराब होती. या सगळ्यामुळे मला चांगलेच टेन्शन आले होते. मला कोरोनाची लागण झाली आहे असेच मला सतत वाटत होते. या सगळ्या टेन्शनमधून बाहेर पडण्यासाठी मी मेडिकेशनची मदत घेतली.