भोपाळ -मध्यप्रदेशात कार्यरत असणाऱ्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) दोन अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली. याआधी त्या राज्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) दोन अधिकाऱ्यांना त्या विषाणूचा संसर्ग झाला. त्यामुळे करोनाशी लढणाऱ्या यंत्रणांची चिंताही वाढीस लागली आहे.
करोनाग्रस्तांपैकी एक आयपीएस अधिकारी भोपाळमध्ये तर दुसरे इंदूरमध्ये रूजू आहेत. त्यांना आता विलगीकरण कक्षांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मध्यप्रदेशात वेगाने करोना फैलाव होत आहे. त्या राज्यातील बाधितांची संख्या 400 जवळ जाऊन ठेपली आहे. प्रामुख्याने इंदूर, भोपाळ आणि उज्जैन जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ते तिन्ही जिल्हे पूर्ण सील करण्याचा आदेश याआधीच देण्यात आला आहे.