मुंबई – देशातील करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे याचा सर्वाधिक फटका अर्थिक क्षेत्राला बसणार असल्याचे अनुमान तज्ञांनी काढले आहे. यात सर्वांचा सहभाग असणारे क्षेत्र म्हणजे बॅंकिंग होय. याचे परिणाम चालू वर्षातील व्यवहारांवर होणार आहेत. यामध्ये चालू वर्षात देशातील बॅंकांचा एनपीए दर 1.9 टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. पेडिट कॉस्टमध्ये 1.30 टक्क्यांनी वाढ शक्य आहे. एस ऍण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने आशिया पॅसिफिक अहवालात हे अनुमान दिले आहे. या क्षेत्रात बॅंकांचे पेडिट कॉस्ट 300 अब्ज डॉलरची (22.50 लाख कोटी रुपये) वाढ होण्याचे संकेत आहेत. तर चिनी बॅंकांचा एनपीए 2 टक्क्यांनी आणि पेडिट नुकसान 1 टक्क्यांनी वधारण्याचा अंदाज आहे.
बॅंकिंग क्षेत्रातील रेटिंग हे सरकार आणि केंद्रीय बॅंकांच्या उपाययोजनांवर निश्चित होणार आहे. करोनाचा वाढता विळखा हा बॅंकिंग क्षेत्राच्या अडचणी वाढविण्याचे संकेत आहेत. परंतु त्यात योग्य वेळी उपाययोजना केल्यास दिलासा मिळण्याच्या आशा या अहवालातून व्यक्त केल्या आहेत. अन्यथा अनेक बॅंका भागभांडवलाची अनुपलब्धता आणि कर्जवसुलीतील अडचणींमुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे.
रेटिंग संस्था पेडिट विश्लेषकांच्या मतानुसार करोनाच्या संसर्गामुळे आगामी दिवसांमध्ये खूप कठिण स्थिती निर्माण होण्याची भीती असून याचा जास्त कालावधीपर्यंतचा प्रभाव आर्थिक क्षेत्राला अडचणीचा राहणर आहे. यात आशिया-पॅसिफिकच्या बॅंकांचा एनपीए 600 अब्ज डॉलरने (45 लाख कोटी रुपये) वाढण्याचा अंदाज या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.