राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, छोटे ग्रुप यांच्याकडून गरिबांसाठी किराणा,जेवण.
जामखेड (प्रतिनिधी) : लाॉकडाऊनमुळे सध्या सर्वसामान्य गरीब जनतेला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे गोरगरिबांच्या हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ज्यांचे हातावरती पोट आहे अशा मजुरांची चुल पेटली पाहिजे सुखाचे दोन घास चार दिवस मिळाले पाहिजेत, या हेतूने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी जामखेड तालुक्यातील युवक काँग्रेस, शिवराणा प्रतिष्ठान, कोठारी प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शंभुसूर्य मर्दानी आखाडा यासह विविध पक्ष,सामाजिक कार्यकर्ते ,सामाजिक संघटना ,विविध मित्र मंडळे मदतीसाठी सरसावले असून यामुळे गरिबांना मोठा आधार मिळत आहे. दरम्यान, या उपक्रमाचा अनेकांना लाभ होत असल्याने अनेकांनी मदत देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. सामाजिक जाणीव असलेल्या अनेकांनी यामध्ये आपला हातभारही लावला आहे.
जामखेड तालुक्यातील आपटी येथे विहीर खोदाई च्यां कामासाठी बीड येथून आलेले मजुरांची लॉकडाऊन मुळे पोटापाण्याची अडचण होत आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले त्यानुसार जामखेड तालुका युवक काँग्रेस तर्फे कॉंग्रेस चे युवा नेते राहुल उगले व सागर अंदुरे यांनी १०० कुटुंबांना ८ दिवस पुरेल एवढे राशन वाटप तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी गौतम पवार यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
जामखेड शहरातील भटके विमुक्त व अत्यंत गरजू कुंटूबाला लाॅकडाऊन असल्यामुळे गरजू व्यक्तिनां हाताला काम नसल्यामुळे उपास मारी होत आहे यांची दाखल घेऊन शिवराणा युथ सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने तपनेश्वर रोड ,गोडावून गल्ली ,नाथनगर,भुतवडा रोड येथे जाऊन भटके विमुक्त व अत्यंत गरजू १२ कुटुंबियांना किराणामालाचे वाटप करण्यात आले यावेळी .अमित गंभीर ,विजय जाधव ,निलेश गायकवाड़ ,बिलालभाई शेख,संजय लहाने ,शिवराणा युथ सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनराज पवार अजिनाथ शिंदे उपस्थित होते.
जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत शहरातील तीस गोरगरिबांना किराणा सामान देण्यात आले आणि जामखेड शहरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एस आर पी एफ च्या पोलीस दलातील जवानांना फळे वाटण्यात आली यावेळी राज्य राखीव दलाचे एस. आर .पी .एफ. पोलीस निरीक्षक अरविंद गीते, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ,सुनील कोठारी, पिंटूशेठ बोरा, चेतन सुराणा, संकेत कोठारी अनिल फिरोदिया ,अभय बोरा ,किरन वडे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांसह हातावर पोट असणााऱ्याचे मोठे हाल होत आहेत याच पाश्र्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रा लक्ष्मणराव ढेपे याांनी स्वखर्चाने शहरात बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस बांधवाना चहा अल्पपोपाहाची सोय करण्यात आली याावेळी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनााही जेवण, औषधे, मास्क देेण्यात आली.
विश्व हिंदु परिषद ,बजरंग दल व शंभुसूर्य मर्दानी खेळ आखाडा यांच्यातर्फे जामखेड शहरातील तसेच शहराबाहेर झोपडीत राहणाऱ्या गोरगरीब वीस कुटुंबाला किमान १० ते १२ दिवस पुरेल इतका किराणा सामान वाटप करण्यात आले आहे. या कीराणा सामान वाटपामुळे गरीबांना मोठा आधार मिळाला आहेयावेळी प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी , विश्व हिंदू परिषद प्रखंडमंत्री दिगंबर राळेभात, संदिप राळेभात ,शंभुसूर्य मर्दानी खेळ आखाड्याचे बबलु टेकाळे ,राजु भांबे, अमोल निमोणकर, रवि क्षिरसागर, प्रणव जाधव, पियुष पडधडिया, विशाल निमोणकर राजेश मोरे हे उपस्तिथ होते. यावेळी उमेश देशमुख , डॉ प्रकाश खैरनार, पोपट राळेभात यांचे सहकार्य लाभले.