न्यूयॉर्क – संपूर्ण जगात थैमान घालत असलेला करोना व्हायारसने आता वन्यप्राण्यांवर ही घाला घालण्यास सुरुवात केली आहे. न्यूयॉर्कमधील एका प्राणी संग्रहालयातील वाघिणीला करोनाची लागण झाल्याची बातमी वृत्तसंस्थेने दिली आहे. एखाद्या प्राण्याला करोनाची लागण झाल्याची ही जगातली पहिलीच घटना मानली जात आहे.
अमेरिकेचे कृषी विभाग राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयातील एका कर्मचाऱ्यांमुळे चार महिन्याच्या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. प्राण्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या या कर्मचाऱ्याला नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. या वाघिणीला आणि अन्य तीन सिंहाना कोरड्या खोकल्याचा त्रास होत असल्याचे प्राणिसंग्रहालय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर वाघिणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. या प्राणिसंग्रहालयाची देखभाल करणाऱ्या वन्यजीव संरक्षण सोसायटीने एका निवेदनाद्वारे याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, 16 मार्च पासून हे प्राणी संग्रहालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, प्राणी संग्रहालयातील पाच वाघ आणि पाच सिंहांमध्ये कोरोनाची लक्षण आढळल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच त्यांची प्रकृती सुधारेल असे प्राणी संग्रहालया कडून सांगण्यात आले आहे. तसेच करोनाची लागण झालेल्या सर्वांना जोपर्यंत पूर्ण माहिती उपलब्ध होत नाही तो पर्यंत प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये असा सल्ला पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे.