राजगुरूनगर-राजगुरूनगर येथे पोलीस आणि आरोग्य कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात ड्युटी करीत आहेत.त्यांचे लहानग्या मुलांकडून आभार मानले जात आहेत. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात ड्युटी करीत आहेत. अशातच शहरात तीन दिवस बंद आहे.पोलीस आणि आरोग्य कर्मचारी याचे जेवणाचे हाल होऊ नयेत यासाठी शहरातील काही कुटुंबाकडून पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जेवणाची नाष्ट्याची सोय करण्यात येत आहे.
राजगुरूनगर शहरात खेड पोलीस आणि बाहेर गावाच्या पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ड्युटी करीत आहेत तर अनेक आरोग्य कर्मचारी आशा वर्कर ड्युटी करीत असल्याने त्यांना जेवण नाष्टा वेळेत मिळत नाही.
शहरातील अनेक दानशूर कुटुंबे व सेवाभावी संस्था त्यांना जेवण नाष्टा देण्यासाठी सरसावल्या आहेत.पोलिसांबरोबर अनेक ठिकाणी काही गरीब लोक कंपनीचे कामगार आहेत त्यांना सेवाभावी संस्था मदत करीत आहेत.
शहरातील काही कुटुंबाकडून पोलिसांना जेवणाचे डबे पाठवले जात असून त्या डब्यांवर थँक्स पोलीस काका, तुम्ही जनतेची काळजी घेता तशी तुम्ही तुमची काळजी घ्या असे पेनाने लिहून संदेश पाठवले जात आहेत.
लहान मुलांच्या या संदेशामुळे पोलीस भारावुन जात आहेत.लहान मुलांच्या या संदेशामुळे पोलिसांना काम करायला उर्मी मिळत आहे तर अनेक दानशूर नागरिकांकडून पोलिसांच्या जेवणाची नाष्ट्याची सोय केली जात आहे त्याबद्दल पोलिसांकडूनही नागरिकांचे ऋण व्यक्त केले जात आहेत.