पिंपरी – चाकणमध्ये अज्ञात व्यक्तीकडून सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना 20 ते 26 मार्च दरम्यान घडली. दरम्यान पिडितेला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 24 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 31) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 26 मार्च 2020 या कालावधीत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पिडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. यामुळे महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.