मुंबई – देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आशा संकटसमयी सरकारी यंत्रणेसोबत सेलिब्रिटीज व खासजी क्षेत्रातील संस्था देखील या भयावह रोगाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय. अशातच आज भारतातील नामांकित उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे.
टाटा समूहाने आजवर देशासमोर उभे ठाकलेल्या अनेक संकटप्रसंगी सामाजिक भान राखत सढळ मदत केली असून कोरोना संकटाच्या विळख्यातून देशाची सुटका करण्यासाठी देखील टाटा समूह धावून आलाय. टाटा समूहाच्या या मदतीबाबत चेअरमन रत्न टाटा यांनी एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
टाटा ट्रस्ट्सच्या कोविड-१९ धोरणाबाबत चेअरमन श्री. रतन एन टाटा यांचे निवेदनमुंबई : भारतात आणि जगात सर्वत्र परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे आणि यावेळी तातडीने कृती करणे गरजेचे आहे. टाटा ट्रस्ट्स आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी याआधी देखील गरजेच्या प्रत्येक वेळी देशाची मदत केली आहे. आता काळाची गरज इतर कशाही पेक्षा सर्वात मोठी आहे.सध्याच्या अभूतपूर्व कठीण काळात, मी असे मानतो की, आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे.आज टाटा ट्रस्ट्स, सर्व संकटग्रस्त समुदायांची सुरक्षा आणि सबलीकरणासाठीच्या वचनबद्धतेला कायम राखत ५०० कोटी रुपयांचे योगदान देत आहे. हे योगदान पुढील कामांसाठी दिले जात आहे –फ्रंटलाईनवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत सुरक्षा उपकरणवाढत असलेल्या केसेसच्या उपचारांसाठी श्वसन प्रणाली (रेस्पिरेटरी सिस्टिम्स)टेस्टिंगची क्षमता प्रत्येक व्यक्तीला मिळेल इतपत वाढवण्यासाठी टेस्टिंग किटसंसर्ग झालेल्या रुग्णांसाठी मॉड्युलर उपचार सुविधा निर्माण करणेआरोग्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्यवस्थापन आणि प्रशिक्षणटाटा ट्रस्ट्स, टाटा सन्स आणि टाटा समूहातील कंपन्या आपल्या स्थानिक व जागतिक सहयोगी आणि सरकार यांच्यासोबत मिळून वंचित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका संयुक्त सार्वजनिक आरोग्य सहयोग मंचावर या संकटाविरोधात लढत आहेत.या आजाराविरोधात लढण्यासाठी आपले जीवन आणि आपली सुरक्षा धोक्यात घालून काम करत असलेल्या सदस्य संघटनांमधील प्रत्येक व्यक्तीबद्दल आमच्या मनात अतिशय सन्मान व कृतज्ञता आहे आणि आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.