मुंबई – राज्यात करोनाच धोका वाढतोच आहे. दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकाचा मृत्यू झाल्यामुळे करोना मृत्यूंची संख्या राज्यात 5वर पोहाचली आहे. मात्र तिच्या मृत्यूचं नेमकं कारण आम्ही तपास आहोत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
नवी मुंबईत 65 वर्षीय एका करोनाबाधित महिलेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तत्पूर्वी, वाशीमध्ये सकाळी एका खासगी रुग्णालयात करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. ही पीडित महिला वाशी येथील रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेमध्ये करोनाची लक्षणे दिसल्याने तिचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. या महिलेचा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट 24 मार्चला आला होता. आज अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.