नवी दिल्ली- जगात काही महिन्यात अतिरिक्त तेल जमा करण्याची जागाच राहणार नाही कारण जगभरातील तेलाची मागणी घटली आहे असं असताना सौदी अरब मात्र आपले तेलाचे उत्पादन वाढण्यावर भर देत आहे, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
चीनने कोरोना पसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून मोठ्या औद्योगिक परिसरातील आपल्या अनेक रिफायनरी बंद केली आहे. त्यानंतर जगभरातील तेल भंडार केंद्र जवळपास तीन चतुर्थांश भरले आहेत.
जगभरात कोरोनाच्या महामारी दरम्यान तेल उद्योग येणाऱ्या आठवड्यात आणि महिन्यात तेल स्टोरेज करत राहील्यामुळे तेल साठवायला जागा उरणार नाही.