- सतरा जण “पॅसिव्ह क्वारंटाइन’
लोणावळा – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरात परदेशातून आलेल्या एकूण 33 लोकांना स्टॅम्पिंग करण्यात आले आहे. त्यातील 16 जणांना ऍक्टिव्ह होम क्वारंटाइन, तर 17 जणांना पॅसिव्ह होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरात अद्यापी एकही करोनाग्रस्त रुग आढळलेला नाही. मात्र एकूण 33 लोक परदेशातून प्रवास करून आलेले आहेत. या सर्वांच्या हातावर क्वारंटाइन स्टॅम्प छापण्यात आले आहे.
लोणावळा शहरातून 33 मधील 17 लोकांना आता परदेशातून परतून 14 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. या सर्वांना “पॅसिव्ह होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर अन्य 16 जणांना 14 दिवसांपेक्षा कमी दिवस झालेले असल्याने “ऍक्टिव्ह होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. या 16 जणांपैकी 6 जण लोणावळा शहरातून परत बाहेर निघून गेले असल्याने उर्वरित 10 क्वारंटाइनमध्ये आहेत. या सर्वांवर लोणावळा नगरपरिषद आणि आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहेत.