मुंबई – काल रात्री थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अस्वस्थतात होती. त्यात आज मी काही नकारात्मक सांगणार नाही. तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, करोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवण्याचा संकल्प करा.
#WATCH Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: I am at home listening to Mrs CM, you listen to your home minister. #COVID19 pic.twitter.com/yl4AokjqA3
— ANI (@ANI) March 25, 2020
कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या. तसेच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असेही त्यांनी सांगितले.
घरांमधील एसी बंद करण्यासंबंधीचे निर्देश केंद्राकडून आले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की ते तर आम्ही केव्हाच सुरु केलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे, घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/pzjUU8PxGS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 25, 2020