चाफळ : चाफळ (ता. पाटण) विभागातील माजगाव येथील शिवमंदिर परिसरात ऊसाचा ट्रॅक्टर आणि दुचाकी यांची धडक जोरदार धडक झाली. या अपघातात अरविंद निवृत्ती रोकडे (वय 52) आणि दिलीप तुकाराम मस्कर (वय 54, दोघही रा. नाणेगाव खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला.
ऊसाचा ट्रॅक्टर चाफळकडून उंब्रजच्या दिशेने चालला होता. तर दुचाकीस्वार उंब्रजहून चाफळच्या दिशेने चालले होते. दुचाकी क्रमांक (एम एच – 09 एटी 2006) हि पाठीमागील ट्रेलरला धडकल्याने दोघेही ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने ठार झाले.