सातारा : वडीलांना सोबत का? घेवून गेला, असा जाब विचारणाऱ्या युवतीला धक्काबुक्की करुन, जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शिवथर (ता. सातारा) येथे घडली आहे.
याप्रकरणी निखिल शंकर साबळे (रा. शिवथर, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, निखिल साबळे हा प्रिया निलेश साबळे (रा. शिवथर) या युवतीच्या वडीलांना घरात कोणालाही काही न सांगता सोबत घेवून गेला होता.
याप्रकरणी 14 मार्चला सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास युवतीने निखिल साबळे यास जाब विचारला असता त्याने युवतीला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. तु नीट बोल, तु कोणाशी बोलतेस तुला कळतयं का ? तुमच्या मुलीला आवरा नाही तर तिला जिवंत मारेल अशी धमकी दिली.
याप्रकरणी प्रिया साबळे हिने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन निखिल साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.