पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघ पुढील तीन दिवस शहरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या महासंघाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
१७ ते १९ मार्च दरम्यान शहरातील घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आला़ आहे. बंद मधून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांना वगळण्यात आले आहे़.
तसेच, परिस्थितीचा आढावा घेवून १९ मार्च रोजी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाने दिली.
शहरातील ४० हजार दुकाने तीन दिवस बंद राहणार
या बैठकीत सराफ, होजिअरी, कापड, ऑटोमोबाईल, प्लायबुड, टिंबर, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस, मेटल पेपर, प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक अॅन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि वेल्डींग, कॉम्प्युटर, टॉईज, वॉच, सायकल, आदी दुकाने बंद राहणार आहेत.
पुणे व्यापारी महासंघांतर्गत विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या ८२ संघटना सभासद आहेत़. शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ही शिखर संघटना आहे़.
मार्केटयार्डातील गुळ भुसार विभाग सुरु राहणार
दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चालू राहणार असल्याचे जाहीर केले आहे़. तसेच बाजार समितीच्या वतीनेही बाजार सुरुच राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील गुळ भुसार विभाग सुरु राहणार असल्याचे दि़ पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले़.
या बैठकीप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, वरिष्ठ, उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, रतन किराड, सचिव महेंद्र पितळीया आदी उपस्थित होते़.