नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणात चारही आरोपीना आता 20 मार्चला फाशी देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळून लावली आहे. आरोपी मुकेश यांनी त्यांच्या भूल सुधार याचिकेवर पुन्हा सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने हि याचिका तर्कहीन असल्याचे म्हणत याचिका फेटाळली आहे. वकिलांनी अयोग्य सल्ला दिल्याचा दावा मुकेश यांनी केला होता. त्यावर न्यायालयाने हे मत मांडले.
यापूर्वी आरोपीना 3 मार्च फाशीची देण्याचे निश्चित झाले होते. परंतु आरोपी पवनकुमार गुप्ता याची दुरुस्ती याचिका दाखल केल्याने फाशी रद्द लांबणीवर पडली होती. सुप्रीम कोर्टाने पवनची याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. फाशीच्या शिक्षेत रद्द करुन जन्मठेप देण्याची विनंती त्याने केली होती.
दरम्यान दोषींना आपले सर्व कायदेशीर अधिकार वापरल्यानंतर आता 20 मार्चला सकाळी दोषींना फाशी देण्यात येणार आहे.