विश्रांतवाडी – पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यावर कारवाई करून हे धंदे बंद केल्याने आता या व्यावसायिकांनी नामी शक्कल लढविली आहे. मटक्याचे आकडे चक्क व्हॉटसऍपवर पाठवून मटका खेळला जात आहे. विश्रांतवाडीत हा प्रकार जोरात सुरू आहे.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मटका हा चिठ्ठीवर न खेळता, पोलिसांना सापडू नये म्हणून व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून खेळला जातो. मटका खेळणारे हे रायटरकडे व्हॉटस्ऍपवर आपले आकडे पाठवत असतात. मटका धंदा करणारे पाठविलेले हे आकडे स्वीकारतात. जर, खेळीला पेमेंट लागले तरी त्याचे पेमेंट देण्याची सोय केली जाते.
सोशल मिडियाचा वापर करून मटका धंदा विश्रांतवाडी मध्ये जोरात सुरू आहे. खुलेआम चालणाऱ्या मटका धंदा कारवाईच्या भीतीने आता सोशल मिडियाद्वारे विश्रांतवाडी मध्ये जोरात सुरू आहे. त्यामुळे वरिष्ट पोलीस अधिकारी सोशल मीडियाद्वारे चालणारा मटका व्यावसाय बंद करणार का? अशांवर काय कारवाई करणार? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहेत.