लंडन – कोरोना विषाणू प्रथमत: चिनमधील वुहानमध्ये आढळला. त्याचे नाव कोरोना व्हायरस डिसीस 2019 असे ठेवण्यात आले. को (CO) कोरोनासाठी, वि (VI) व्हायरससाठी आणि द (द) डिसीससाठी असे शब्द घेऊन त्याने नामकरण कोविद 19 असे करण्यात आले. यातच मिळालेल्या माहितीनुसार, हॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्याला आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाला आहे. या अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून त्याला आणि पत्नीला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं.
हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता टॉम हॅक्स आणि त्याची पत्नी रिटा विल्सन यांना करोनाची लागण झाली आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे ऑस्ट्रेलियामध्ये असून त्यांना लागण झाल्याचं टॉमने सांगितलं.
टॉम म्हणाला,’सर्दी आणि अंगदुखीमुळे आम्हाला प्रचंड थकवा जाणवत होता. रिटाला तर सतत थंडी वाजून ताप येत होता. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आम्हाला रुग्णालयात जाऊन तपासणी करणं योग्य वाटलं. त्यानुसार आम्ही आवश्यकत्या तपासण्या केल्या. यात आम्हाला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं.’