जरी आपण एकटे असलो,
तरी ती आपल्या सोबत असते.
आपण सुखात असो किंवा दुःखात असो,
ती आपल्या सोबत असते.
चंद्राचे चांदणे असो किंवा सुर्याची किरणे असो,
ती आपल्या सोबत असते.
पण अंधारात जेव्हा तिला आपली गरज असते,
तेव्हा आपण सोबत असुनही,
ती बिचारी एकटी असते.
अशी ती प्रामाणिक आपली सावली असते…
– अनि__रूध्द
मास्टर्स इन ऑपरेशनल एक्सलंन्स,
होफ युनिव्हर्सिटी ऑफ अप्लायड सायंन्स, होफ, जर्मनी