पिंपरी – कामाचे पैसे मागितले म्हणून एका कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन जणांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे 3 फेब्रुवारी राजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
सुभाष विश्वनाथ साह (वय 33, रा. ताथवडे. मूळ रा. बिहार) असे नाव आहे. त्याने बुधवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोहम्मद अन्वर झुमरातिया (वय 40, रा. तापकीरनगर, पुणे), संतोषकुमार हरकराम (वय 36, रा. ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.