नवी दिल्ली – एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा एका तरुणीने दिल्या होत्या. या तरुणीला पोलिसांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केले असून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Karnataka: Amulya (who raised ‘Pakistan zindabad’ slogan at an anti-CAA rally in Bengaluru, yesterday) & was charged with sedition, sent to 14-day judicial custody pic.twitter.com/vWS55tDZEQ
— ANI (@ANI) February 21, 2020
माहितीनुसार, बंगळुरूमध्ये सीएएविरोधी रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणीने थेट व्यासपीठावरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तरुणीचे नाव अमूल्या लियोना असे सांगितले जात आहे. यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले.
अमूल्याला गुरूवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या घटनेवर ओवेसी म्हणाले….
आपल्या व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याबद्दल ओवेसी यांनी खेद आणि निंदा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मी नमाज पठण करायला जाताना ही घोषणाबाजी झाली. मी तात्काळ ती थांबवली. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘भारत जिंदाबाद था और रहेगा’, आम्ही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेचे समर्थन करत नाही.