अकलूज- अकलूज शहर व हद्दीतील मुसक्या आवळून तडीपार केलेल्या 23 गुंडांवर अकलूजचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी मोक्काअंतर्गत कारवाईचे शत्र उगारल्याने अकलूज व परिसरातील गुंडांनी अकलूज पोलिसांचा चांगलाच धसका घेतला आहे.
अकलूज गुंडगिरी मुक्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक निंबाळकर व उपविभागीय पोलिस अधिकारी धीरज राजगुरू यांनी अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील गुंडगिरी विरोधात बेधडक मोहीम सुरू केली अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत परिसरातील 23 गुंडांना तडीपार केले होते. तसेच आणखी 10 गुंडांवर तडीपारीची कारवाई सुरू आहे. त्यातच अकलूजमधील एका तरुणाचा खून झाल्याने तडीपार गुंडां विरोधात पोलिसांनी अधिक कडक कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ज्या गुन्ह्यात जामीन नाही अशा मोका कायद्या अंतर्गत कारवाई सुरू आहे. गुंड कितीही चालाख असला तरी त्याला सोडणार नाही. त्याला पोलिसी हिसका दाखवून अकलूज गुंडगिरी मुक्त करणारच, असा ठाम विश्वासही ही यावेळी निंबाळकर यांनी बोलून दाखवला.