नवी दिल्ली : मासिक धर्म आलेल्या महिलेने केलेला स्वयंपाक केल्यास श्वान योनीत जन्म मिळतो, असा आशयाचा गुजरातमधील स्वामीनारायण भूज मंदिरमधील स्वामींच्या संदेशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या संदेशाला उत्तर देण्यासाठी दिल्लीतील एका स्वयंसेवी सस्थेने मासिकधर्म महाभोजनाचे आयोजन केले आहे. यात मासिकधर्म आलेल्या स्त्रीया भोजन बनवणार आहेत,अ से सच्ची सहेली या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित प्रसुतीतज्ज्ञ डॉ. सुरभी सिंह यांनी सांगितले.
या पुजाऱ्यांच्या संदेशाकडे गांभीर्याने पाहिले पाहीजे. कारण, या ट्रस्टतर्फे अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवली जातात. त्यांच्या भूज येथील महाविद्यालयांत मुलींना मासिक धर्म येत नसल्याची खातरजमा केली जात असे. त्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्यावर त्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला. त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य, शिपाई आणि अधिष्ठाता निलंबित करण्यात आला.
महिला कुत्र्याचा पुनर्जन्म मिळण्याच्या धमकीस भीक घालत नाहीत अथवा, पुरूष तो स्वयंपाक खाल्ल्याने बैल योनीत जन्म मिळतो, या अपप्रचाराला बळी पडत नाहीत, हे दाखवण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येत आहे. जर स्वामींचे शब्द खरे असतील तर कुत्र्यांची संख्या आपण अपेक्षित धरल्यापेक्षा कितीन तरी पटींनी वाढायला हवी होती, अशा शब्दात त्यांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली.
हा स्वयंपाक बनवण्यासाठी सिुमारे 50 महिला असतील तर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सुमारे 250 जण येतील. हे अन्न फुकट नाही. त्यासाठी त्यांनी किमान किंमत द्यावी अशी अपेक्षा आहे. याबाबत केवळ समाज माध्यमांत प्रचार करून हाती काही लागणार नाही. त्यामुळे आम्ही या भोजनाची कल्पना पुढे आणली.÷23 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होणार आहे. याबाबत माझ्या प्रबोधनात्मक व्याख्यानांना मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, असा अनुभव त्यांनी सांगितला.