पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. भारतात आढळला कोरोना विषाणूचा तिसरा रुग्ण
कोरोनाचा तिसरा रुग्णही केरळमध्येच
2. गांधींजींचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होते
अनंतकुमार हेगडे यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
3. गोली मारना बंद करो; देश को तोडना बंद करो
अनुराग ठाकुर यांचे भाषण सुरू होताच सभागृहात घोषणाबाजी
4. लाखोंचे बक्षिस असणाऱ्या 27 वॉंटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर जाहीर
पोस्टर जाहीर करत नागरिकांना मदत करण्याचे पोलिसांचे आवाहन
5. कोरोना व्हायरसवर औषध सापडले
थायलंडमधील डॉक्टरांचा दावा
6. कोरोना विषाणूचा चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका
शेअर बाजारात 9 टक्क्यांची घसरण : जनरल मोटर्स, ऍपलने काम थांबवले
7. फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार
राज्य सरकारकडून दोन सदस्यीय समिती स्थापन
8. मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून हिरवा कंदील
9 फेब्रुवारीला मनसेकडून घुसखोऱ्यांविरोधात आंदोलन
9. वर्ध्यात तरुणीला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार
तरुणाने तरुणीवर पेट्रोल ओतून पेटवले..तर कारण अद्याप अस्पष्ट
10. क्रिकेटच्या मैदानानंतर आता गोलंदाज हरभजन सिंहची चित्रपटसृष्टी एन्ट्री
फ्रेंडशिप चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित