माउंट माउंगनुई (न्यूझीलंड) : रोहित शर्माचे अर्धशतक आणि जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने मालिकेतील पाचव्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ७ धावांनी विजय नोंदवला. यासह भारताने या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. याच सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आपल्या नावे एक विक्रम जमा केला.
जसप्रीत बुमराहने सामन्यात एक निर्धाव षटक टाकले. हा बुमराहचा विक्रम ठरला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणा-या गोलंदाजांच्या यादीत बुमराहने अव्वल स्थान मिळवले आहे.
Rohit Sharma now has the most 50+ scores in T20Is!
What. A. Player 👏 pic.twitter.com/sndcg8jeBq
— ICC (@ICC) February 2, 2020
रोहितने ६० धावांची खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे उपचारांसाठी त्याला मैदान सोडावे लागले. अर्थात तरीही या अर्धशतकी खेळीने रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार केला. तसेच रोहितचे हे रौप्यमहोत्सवी अर्धशतक ठरले. न्यूझीलंडविरूध्द टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके फटकावणा-या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी पोहचला आहे.