नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते गिरीराज सिंग आपल्या आणखी एका विविदतीत वक्तव्यामुळे माध्यमांच्या प्रकाशझोतामध्ये आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असं की, गिरीराज सिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एआयएमआय प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यासोबत लिहिलेल्या संदेशामध्ये ओवैसी यांच्यासारख्या कट्टरतावाद्यांसाठी पाकिस्तान हाच योग्य देश असल्याचं म्हंटल आहे.
गिरीराज सिंग यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असदुद्दीन ओवैसी हे लोकसभेमध्ये बोलताना दिसत असून ते सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध नोंदविताना दिसत आहेत. याच व्हिडिओचा आधार घेत गिरीराज सिंग यांनी ओवैसी यांच्यावर जामिया व एएमयूच्या विद्यार्थ्यांमध्ये देशविरोधी विष पेरल्याचा देखील आरोप लगावला आहे.
ओवैसी जैसे कट्टरपंथी जामिया/AMU जैसे शिक्षण संस्थानों में देश के खिलाफ जहर घोल देश के खिलाफ एक देशद्रोही सेना बना रहे है।
ओवैसी और ऐसे पनप रहे संविधान विरोधियो को रोकना होगा।
भारतवंशी अब जग गये है,हमें दबाओ नहीं तोड़ो नही।
तुम्हारे लिए पाकिस्तान बना दिया था अब हमें चैन से जीने दो pic.twitter.com/mSu4PVeiVX
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) February 3, 2020