नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलेला दयेचा आर्जासोबत त्याची डायरी द्यावी म्हणून दिल्ली न्यायलयात धाव घेतली आहे.
मुकेश सिंह या आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या आठवड्यात फेटाळला होता. हा आतापर्यंतचा या संदर्भातील सर्वात जलद घेतलेला निर्णय होता. त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर विनय शर्मा याने फाशी टाळण्यासाठी अटापिटा सुरू केला आहे.
त्याचे वकील ए. पी. सिंग म्हणाले, त्याचा दयेचा अर्ज तयार आहे. मात्र 22 जानेवारीला त्याच्याशी बोलल्याप्रमाणे त्याची 170 पानांची डायरी राष्ट्रपतींकडे देण्याची त्याची इच्छा आहे. त्या बाबत आपण कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला आहे. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही.