पुणे – सर्वसामान्यांच्या न्याहरीचा अविभाज्य घटक असलेला पदार्थ म्हणजे ‘पोहे’! पचनासाठी आणि खिशासाठी ‘हलके-फुलके’ असलेले पोहे जर तुम्ही शिक्षणासाठी अथवा नौकरी निमित्ताने घरापासून दूर असाल आणि ‘बॅचलर’ लाईफ जगत असाल तर तुमच्या नाश्त्याच्या लिस्टमध्ये सुदैवच ‘ट्रेंडिंगवर’ असणार यात तिळमात्र शंका नाही. मात्र नाश्त्याच्या लिस्टमध्ये ट्रेंडिंग असणारे हे पोहे आज भाजपच्या एका नेत्याच्या वक्तव्यामुळे ट्विटरवरही भाव खाताना दिसत आहेत.
भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना एक किस्सा सांगितला. त्यांच्या घरामध्ये किरकोळ बांधकामासाठी काही मजूर आले असता ते केवळ पोहे खात असल्याचे निदर्शनास आल्याने ते बांगलादेशी असल्याचा साक्षात्कार आपल्याला झाल्याचं ते म्हणाले होते.
दरम्यान, विजयवर्गीय यांचं हे पोह्यांबाबतच वक्तव्य नेटकऱ्यांसाठी ‘मेजवानी’ ठरलं असून सोशल मीडियावर मिम्सच्या माध्यमातून या वक्तव्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
वाचा नेटकऱ्यांच्या अशाच काही भन्नाट प्रतिक्रिया व मिम्स