चिंबळी- कुरुळी ग्रामपंचायतीच्या 17 जागेसाठी 2020 ते 2025 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. कुरुळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी शनिवारी (दि. 18) विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच सचिन कड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या सभेत निवडणूक अधिकारी तथा मंडलाधिकारी चेतन चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी छाया इरणक, तलाठी दीपक जाधव, उपसरपंच विजय कांबळे व सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रभाग रचना पुढील प्रमाणे; प्रभाग क्रमांक एक (दोन जागा): सर्व साधारण महिला व सर्व साधारण. प्रभाग क्रमांक दोन (तीन जागा) : नागरिकांचा मागास वर्ग पुरूष, सर्व साधारण महिला (2). प्रभाग क्रामांक तीन (तीन जागा) : नागरिकांचा मागास वर्ग महिला, सर्व साधारण महिला, सर्व साधारण. प्रभाग क्रमांक चार (तीन जागा) : अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्गीय महिला, सर्व साधारण. प्रभाग क्रमांक पाच (तीन जागा) : अनुसूचित जमाती पुरूष, नागरिकांचा मागासवर्गीय महिला, सर्व साधारण. प्रभाग क्रमांक सहा (तीन जागा) : अनुसूचित जमाती पुरूष, नागरिकांचा पुरूष, सर्व साधारण.