नवी दिल्ली : एटीके संघाने शनिवारी इंडियन सुपर लीगमध्ये झालेल्या सामन्यात एफसी गोवा संघाचा २-० ने पराभव करत विजय नोंदविला.
Seventh heaven for @ATKFC 🌫
The hosts extend their unbeaten home streak against @FCGoaOfficial to 7⃣ #HeroISL matches 👊#ATKFCG #LetsFootball pic.twitter.com/XQFNMkF6Q5
— Indian Super League (@IndSuperLeague) January 18, 2020
एटीके संघाकडून प्रीतम कोटलने सामन्याच्या ४७ व्या मिनिटाला गोल करत १-० ने आघाडीवर नेले. त्यानंतर जयेश राणेने शेवटच्या क्षणी ८८ व्या मिनिटांला संघास २-० ने विजयी आघाडी मिळवून दिली.
एफसी गोवा संघाला एकही गोल करता आला नाही आणि पराभवाला सामोरे जावं लागले. दोन्ही संघाचे प्रत्येकी १३ सामने झाले अाहेत. दोन्ही संघाचे २४-२४ गुण झाले असून गोलफरकामुळे गुणतालिकेत एटीकेचा संघ अव्वलस्थानी तर एफसी गोवा संघ दुस-या स्थानी आहे.