चांद्रयान २ मोहीम फसण्याचा अंदाज मोदींना होता?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी चांद्रयान प्रक्षेपणाचं उदाहरण दिलं. चांद्रयान मोहीम अपयशाची शक्यता असल्यामुळेच मी तेथे गेलो, असे मोदींनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, सात सप्टेंबरला विक्रम लँडरचे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग पाहण्यासाठी मोदी सुद्धा बंगळुरुमधील इस्रोच्या नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित होते. चांद्रयान मोहीम यशस्वी होईलच याची खात्री नव्हती. त्यामुळे चांद्रयान प्रक्षेपणावेळी न जाण्याचा सल्ला मला अनेकांनी दिला होता. पण मोहिम अयशस्वी झाली तर काय? यासाठीच मी तिथे गेलो असल्याचे ते म्हणाले.

प्रक्षेपणावेळी शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील तणाव पाहून काहीतरी चुकीचं घडतंय हे समजत होतं. पण मी त्यांना चिंता करू नका असे सांगून तेथून निघालो. मला रात्रभर झोप येत नव्हती. सकाळी मी कार्यक्रमात बदल करुन सर्व शास्त्रज्ञांची बैठक घेतली, भावना व्यक्त केल्या, कौतुक केलं, त्याने देशाचं आणि शास्त्रज्ञांचं सगळंच वातावरण बदललं असल्याचं ते म्हणाले. अपयशातूनही यशाचा धडा शिकू शकतो, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दरम्यान, चांद्रयान-2’ मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर ‘विक्रम लँडर’चे सॉफ्ट लँडिंग झाले नाही. त्यामुळे “विक्रम’ लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. जेव्हा विक्रमचा संपर्क तुटला त्यावेळी तो चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर होता. त्यावेळी त्याचा वेग प्रतिसेकंद 60 मिटर होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.