नवी दिल्ली – देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या मुकेश या आरोपींची दया यचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहेत. आरोपी मुकेशने सर्वोच्च न्यायालयाने दुरूस्ती याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. दरम्यान, दिल्ली पटियाला न्यायालयाने मुकेशसह तीनही आरोपींचे डेथ वारंट जारी केले होते.
Ministry of Home Affairs (MHA) Sources: One of the convicts of 2012 Delhi gang rape case, Mukesh’s mercy plea has been rejected by President Kovind, MHA has received the communication. pic.twitter.com/uwg3PMudG1
— ANI (@ANI) January 17, 2020
दरम्यान, मुकेश (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंह (31) या आरोपींवर दिल्ली न्यायालयाने 22 जानेवारीला सात वाजता फाशी द्यावी म्हणून डेथ वॉरंट काढले आहे. मात्र राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४ दिवसांचा कालावधी नव्या डेथ वॉरंटसाठी द्यावा लागेल. त्यामुळे २२ जानेवारी रोजी फाशी होण्याची शक्यता कमी आहे.
निर्भया या 23 वर्षीय पॅरीमेडिकल विद्यार्थीनीवर 16 डिसेंबरच्या मध्यरात्री सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी निर्घृण मारहाण केली. निर्भयाचा उपचार सुरू असताना 29 डिसेंबर 2012 रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. त्यातील एकाने कारागृहात आत्महत्या केली. एका अल्पवयीनाने तीन वर्ष सुधारगृहात काढल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.