सांगली : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य करुन उदयनराजे यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष भिडे गुरूजी यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. दरम्यान, सांगली बंदची हाक दिलेल्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी राजकीय षडयंत्र असल्याचे म्हणत विरोधी पक्षावर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,’सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचे मला वाटते. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच, सुप्रिया सुळे यांना संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही सल्ला देणार का? असा सवाल उपस्थित पत्रकारांनी केला. यावेळी माझ्याकडे कोणी सल्ला मागितल्याशिवाय मी कोणालाही सल्ला देत नाही.’