नवी दिल्ली: निर्भया प्रकरणात फाशी झालेल्या चार दोषींना फाशी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तिहार कारागृहात फाशीच्या तयारीची चाचणी करण्यात आल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली आहे.
न्यायालयाने मुकेश (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31)या चार दोषींना फाशीचे वॉरंट बजावले होते. कोर्टाने चौघांना 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता तिहार तुरूंगात फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.
तुरूंगातील अधिकाऱ्याच्या एका पथकाने रविवारी डमीला आरोपीला फाशी देण्याचा सराव केला. जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हेगारांच्या वजनानुसार डमी तयार केली गेली. त्यांनी सांगितले की, दोषींना तुरूंगातील क्रमांक तीनमध्ये फासावर लटकवण्यात येईल .
या चार दोषींना फाशी देण्यासाठी हँगमन मेरठहून पाठविण्यात येणार असल्याची पुष्टी उत्तर प्रदेश जेल प्रशासनाने दिली आहे. तिहार कारागृह प्रशासनाने यूपी जेल प्रशासनाला दोन जल्लाद पाठवण्याची विनंती केली होती.
चारही आरोपीना एकाच वेळी फासावर लटकवण्यात येईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरूंग अधिकारी आरोपीबरोबर नियमित संवाद साधत आहेत जेणेकरून त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील.
या प्रकरणातील आरोपी रामसिंगने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली आहे, तर दुसरा आरोपी हा अल्पवयीन होता. तीन वर्ष सुधारगृहात त्याला सोडण्यात आले.