मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मीनस जवळ डिमेलो रस्त्यावर आराम करत बसलेल्या टॅक्सीचालकाला फेरी मारून आण्याचा रेल्वे पोलिस दलातील हवालदाराचा आदेश नाकारला. त्यामुळे या चालकाला बेदम मारहाण करून त्याच्यावर बलात्कार करण्याची खळबळजनक घटना घडली.
अमित धांकड असे या हवालदाराचे नाव आहे. त्याने या टॅक्सीचालकाला ग्रांट रोड भागातून फेरी मारून आणण्याचा आदेश दिला. त्याला या टॅक्सीचालकाने नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या या हवालदाराने त्याला बेदम मारहाण केली.
त्याला रेलवे स्थानकाच्या आवारातील निर्जन भागात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्याच्याकडील मोटारीच्या चाव्या, पैसे आणि अन्य चीजवस्तू काढून घेतल्या.
या टॅक्सीचालाच्या फिर्यादीवरून एमआरए मार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी धांकडला अटक केली. या धक्कादायक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिस दलाने धांकडला तातडीने निलंबित केले आहे.