सिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलासह राज्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी सकाळी गोठवून टाकणारी थंडी अनुभवायला आली. अनेक टिकाणी पारा शुन्य अंशाखाली होता, असे हवामान खात्याने सांगितले. बर्फवृष्टी झाल्याने राज्यातील 900 मार्गावरील वाहतूक बंद पडली.
पयटकांनी कुप्री आणि मशोब्राच्या दिशेने जाऊ नये कारण बर्फवृष्टीने हे मार्ग बंद आहेत, अशी फेसबुक पोस्ट सिमला पोलिसांनी गरूवारी सायंकाळी केली होती. सिमला हवामान खात्याचे संचालक मनमोहन सिंग म्हणाले, आदिवासी लाहौल स्पीटी जिल्ह्यात निचांकी तापमान होते. तेथे उणे 17.6 अंश तापमान नोंदवले जाइरल. मनालीत उणे 7.6 अंश तापमान होते. कल्पमध्ये उणे 6.4 आणि पालमपूरमध्ये उणे एक अंश तापमान नोंदवले गेले.
सेवबागमध्ये उणे 2.5, सुंदरनगरमध्ये उणे दोन, सोलान आणि भुंतार मध्ये उणे 1.6 तापमान नोंदवले गेले.