पोलिसांनी ओळख पटवलेल्या आठ जाणांची नावे केली जाहीर; घोषच्या नावामुळे आश्चर्य व्यक्त
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी सायंकाळी झालेल्या हिंसाचारात सहभागी असणाऱ्या नऊ संशयितांना पोलिसांनी ओळखले आहे. त्यांची नावे शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. त्यात या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेषा घोष यांचाही समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिस उपायुक्त जॉय तिरके म्हणाले, पाच जानेवारीला पेरीयार हॉस्टेलवर केलेल्या हल्ल्याचे नेतृत्व जेएनयु विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयेषा घोष हिने केले. विद्यापीठ प्रशासनाने एक ते पाच जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्याला जेएनयु विद्यार्थी संघटनेचा विरोध होता.
या हल्ल्यात सहभागी झालेलेल अन्य विद्यार्थी पुढील प्रमाणे, चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, आयेषा घोष, विजय वास्कर, सुचेता तालुकराज, प्रिया रंजन, दोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज आणि विकास पटेल.
दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एम. एस. रांधवा म्हणाले, यामध्ये दाखल केलेल्या तक्रारींचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे. यात आता पर्यंत नऊ जणांची ओळख पटली आहे. मात्र याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.