नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आसाममध्ये सुरु असलेले आंदोलन अद्यापही सुरु असून यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम दौरा रद्द केला आहे. देशातील वातावरणामुळे पुर्वनियोजित दौरा रद्द करण्याची पंतप्रधानांची ही दुसरी वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी खेलो इंडिया युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार होते. मोदींचा हा प्रस्तावित दौरा होता. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला असून एका महिन्यात दुसऱ्यांदा असं घडलं आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.