कोणत्याही तरुणीला आपला जोडीदार कसा असावा, असा प्रश्न विचारला तर तिच्या याबाबतच्या अपेक्षांमध्ये एक प्रमुख आणि हमखास आढळणारा मुद्दा म्हणजे “तो माझी काळजी घेणारा असावा’! अगदी सिनेसृष्टीतील तारकाही वेगवेगळ्या शोंमधून किंवा मुलाखतींमधून हे बोलताना आपल्याला दिसतात.
बहुतेकींना तसे जोडीदार मिळतातही! अर्थात विवाहापूर्वीच्या भेटीगाठी, भटकंतीदरम्यान आपला लाईफ पार्टनर खरोखरीच आपला केअरटेकर आहे का हे समजत असते.
आता आलियाचंच उदाहरण घ्या ना ! रणबीर कपूरसोबत लवकरच बोहल्यावर चढणार असणाऱ्या आलियाचीही अशी अपेक्षा होती आणि तिला त्याचे प्रत्यंतरही नुकतेच आले. आलिया आणि रणबीरचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमधून रणबीर आपल्या गर्लफ्रेंडबाबत किती प्रोटेक्टिव्ह आहे हे लक्षात येते.
आलिया भट एके ठिकाणी गेली असता तिथे चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली. ती गर्दी पाहून आलियालाही काहीसा त्रास होऊ लागला. चाहत्यांमधील चढाओढ, धक्काबुक्की पाहून ती काहीसे अनकम्फर्ट फील करु लागली. त्यावेळी रणबीर कपूर तिथे एखाद्या बॉडीगार्डसारखा गेला आणि त्याने या गर्दीतून आलियाला बाहेर आणले.
View this post on Instagram
BAE?❤️ . . . ..#RanbirKapoor #AliaBhatt #RanbirAlia #Ranlia #Bollywood #Celebrity #Love
गर्दीतील प्रत्येकाला आलियासोबत आणि या जोडगोळीसोबत फोटो काढायचे होते; पण आलियाच्या चेहऱ्यावरील घाबरलेपणाचे भाव ओळखून रणबीरने तिला कारपर्यंत सुखरूप आणले आणि दोघे निघून गेले. रणबीरचा हा बॉडीगार्ड स्टाईल अंदाज आलियाला आवडला नसेल तरच नवल!