दोहा : भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि नेदरलँड्सचा वेस्ली कूलहोफ या जोडीने कतार ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बोपन्ना आणि कूलहोफ या तिस-या मानांकित जोडीन स्वित्झर्लंडच्या स्टॅन वाॅवरिंका आणि अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफो जोडीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला.
Indian tennis player Rohan Bopanna and his Dutch partner Wesley Koolhof reach semifinals of Qatar Open. #ATP
— Press Trust of India (@PTI_News) January 8, 2020
उपांत्य फेरीत रोहन-वेस्ली जोडीसमोर दुस-या मानांकित हेन्री कोन्टिनेन-फ्रान्को स्कूगोर या जोडीचे आव्हान असणार आहे.
हेन्री कोन्टिनेन आणि फ्रान्को स्कूगोर या जोडीने अमेरिकेच्या केन आणि नील स्कुपस्की या जोडीचा ६-७(२), ६-४, १३-११ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.