नवी दिल्ली : एफसी गोवा ने बुधवारी झालेल्या लढतीत नाॅर्थईस्ट यूनाइटेड संघाचा २-० ने पराभव करत विजय नोंदवला आहे. एफसी गोवा संघाची इंडियन सुपर लीग फुटबाॅल स्पर्धेतील ही १०० वी लढत होती. या विजयासह एफसी गोवा संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
A memorable end to a landmark day for @FCGoaOfficial 🙌#FCGNEU #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/ym3lCMKj87
— Indian Super League (@IndSuperLeague) January 8, 2020
एफसी गोवा कडून मिस्लव कोमोरस्कीने ६८ व्या तर फेरान कोरोमिनासने ८२ व्या मिनिटाला गोल केला.कोरोमिनासचा या सत्रातील ८ वा गोल ठरला आणि याबरोबरच या सत्रात त्याने सर्वाधिक गोल करण्याच्या खेळाडूच्या यादीत एटीके संघाच्या राॅय कृष्णाशी बरोबरी साधत संयुक्तरित्या अव्वल स्थान पटकाविले आहे.
एफसी गोवा संघाची १२ सामन्यातील हा ७ वा विजय होता. यासह २४ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचले आहेत. नाॅर्थईस्ट संघाचा १० सामन्यातील हा ५ वा पराभव होता आणि ते ११ गुणांसह गुणतालिकेत ८ व्या स्थानी आहेत.