बर्लिन : पश्चिम जर्मनीचे माजी गोलरक्षक हॅन्स टिल्कोवस्की यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांनी ३९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पश्चिम जर्मनीचे प्रतिनिधित्व केले.
Rest in peace to Hans #Tilkowski, who passed away yesterday at the age of 84. 🙏#DieMannschaft pic.twitter.com/WZZXga3mAG
— germanfootball_dfb (@DFB_Team_EN) January 6, 2020
१९६६ च्या फुटबाॅल वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या जाॅफ हर्स्ट यांनी केलेला गोल अडवण्यात अपयश आल्यामुळे टिल्कोवस्की चर्चेत आले होते.
Former Germany goalkeeper Hans Tilkowski has passed away at the age of 84.
He was in goal during the 1966 World Cup final which West Germany lost 4-2 to England – controversially.pic.twitter.com/4pOo4t2hbo
— DW Sports (@dw_sports) January 6, 2020
साल १९६६ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये जर्मनीला इंग्लंडकडून २-४ असा पराभव स्विकारावा लागला होता. निर्धारित वेळेपर्यत सामन्याचा स्कोर २-२ असा बरोबरीत होता पण अतिरिक्त वेळेत इंग्लंडने केलेले गोल अडवण्यात टिल्कोवस्की यांना अपयश आले होते आणि इंग्लंडचा संघ विश्वविजेता झाला होता.