नवी दिल्ली : ओडिशा एफसी ने सामन्याच्या पूर्वार्धात चार मिनिटांच्या आत दोन गोल करत इंडियन सुपर लीग (ISL) फुटबाॅल स्पर्धेत चेन्नईन एफसी संघाचा २-० ने पराभव करत विजय नोंदवला.
2⃣ first-half goals were enough for @OdishaFC to claim back-to-back wins for the first time in the #HeroISL!#OFCCFC #LetsFootball pic.twitter.com/Yu7ZwHNRRn
— Indian Super League (@IndSuperLeague) January 6, 2020
ओडिशा एफसी कडून जैरी मावीमिंगथांगाने ३७ व्या मिनिटांला आणि विनीत राय याने ४१ व्या मिनिटांला गोल केले. सामन्याच्या उत्तरार्धात चेन्नईन एफसीने पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले.
ओडिशाचा ११ सामन्यात हा चौथा विजय ठरला. या विजयासह त्याचे १५ गुण झाले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी पोहचले आहे. चेन्नईन एफसी चा १० सामन्यातील हा ५ वा पराभव ठरला. त्याचा संघ ९ गुणांसह गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे.