बर्घिंघम : भारतीय स्क्वाॅशपटू अनाहत सिंह हिला ब्रिटीश ज्युनियर ओपन स्क्वाॅश स्पर्धेमध्ये १३ वर्षाखालील मुलींच्या गटात एकेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात इजिप्तच्या अमिना ओर्फीने अनाहत हिचा ११-०, ११-१, ११-४ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
That's three BJO titles in a row for Amina !!!
G13 [1] Amina Orfi (Egy) 3-0 [3/4] Anahat Singh (Ind) 11-0, 11-1, 11-4 pic.twitter.com/E2siwjz5n7
— British Junior Open (@BJOsquash) January 6, 2020
दरम्यान, अनाहत हिने रविवारी उपांत्य फेरीत इजिप्तच्या जान्ना गलाल हिचा ७-११, ११-७, १३-११, ५-११, १७-१५ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दुसरीकडे, भारताच्या वीर चोटरानीला १९ वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. इजिप्तच्या मुस्तफा अल सिर्तीने वीर चोटरानीचा ११-७, २-११, ६-११, ८-११ असा पराभव केला.